आज
15 ऑगस्ट-2017 ला स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स. 8:00 वा. संस्थेचे संस्थापक मुख्याध्यापक श्री बी.के. थटेरे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडावंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.डी.नारनवरे
यांनी प्रास्ताविक भाषण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व देशभक्तीपर
गीते प्रस्तुत केले.
माध्यमिक शालांत परिक्षेत प्रथम तीन आलेले व विविध परिक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार या प्रसंगी त्यांना पुरस्कृत करून करण्यात आले. तसेच विकास हायस्कूल कर्मचारी पतसंस्थेमार्फत माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके संस्था अध्यक्षा सौ. व्ही. जे.
ठमके मडम यांच्या हस्ते देण्यात आंले. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, माजी मुख्याध्यापक, कर्मचारी, पालक व गणमान्य व्यक्ती
उपस्थित होते.

