भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

                                       

                          भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

    आज 15 ऑगस्ट ला स्वातंत्‍​र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. . 8:00 वा. संस्थेचे संस्थापक मुख्याध्यापक श्री बी.के. थटेरे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडावंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री सी.पी. चौकसे यांनी प्रास्ताविक भाषण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले

       माध्यमिक शालांत परिक्षेत प्रथम तीन आलेल्या विविध परिक्षेत प्राविण्य प्राप्त  विद्यार्थ्यांचे सत्कार या प्रसंगी करण्यात आले. विकास प्राथमिक विद्यालय आणि बळीरामजी दखने हायस्कूलच्या विद्याथ्‍​र्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते नृत्य सादर केले. मा. अध्यक्ष महोदयांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य, अभ्यास देशप्रेम करण्याकरीता शपथ दिली.
 
        संस्थेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. व्ही.वाय. बारई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री एस.जी. अल्लडवार सरांनी केले. याप्रसंगी विध्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी शिक्षक, पालकवर्ग व गणमान्य व्यक्ति उपस्थित होते.

SSC-March2016 परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

                             SSC-March2016 परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश                                          .                            .                       

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे द्वारे जाहीर झालेल्या माध्यमिक शालान्त परीक्षा ई. १० च्या निकालात शाळेतील ८१.४२ टक्के  विध्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!


एस.एस.सी. परीक्षेत बसलेल्या एकूण १८३ विध्यार्थ्या पैकी १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात कु. भाग्यश्री किशोरचंद्र बावनकुळे हिने ९२.८० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे शैलेश भाऊराव लिल्हारे याने ८८.४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु.शिवानी सुरेश चौकसे हिने ८१.४ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. 

परीक्षेत शाळेतून एकूण  ५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यात  १२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
वर्ग १० ला शिकविणारे सर्व शिक्षकांचे अभिनंदन! त्यांनी विद्यार्थ्यामागे केलेल्या  मेहनतीला यश प्राप्त झालेले आहे.
पुनश्य: सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन!

                                                               शालेय   गुणवत्ता  यादी 

                                                               उत्तीर्ण  विद्यार्थी  यादी