HRA

कशी मिळवावी घरभाडे भत्ता वजावट?
जर आपण किरायाच्या घरात किंवा फ्लॅट मध्ये राहत असाल तर आयकर कायदा कलम 10 (13 A)
आणि 80 GG अंतर्गत काही अटींचे पालन करून आपण निश्चित प्रमाणात कर सवलतींचा लाभ घेऊ शकता.करपात्र एच.आर.ए. पूर्णपणे किंवाअंशतः करमुक्त असू शकतो. खाली दिलेल्या एच.आर.ए.सूट कॅल्क्युलेटर आपल्याला मिळालेल्या एच.आर.ए. चा कोणता भाग कर माफ आहे,हे काढण्यास मदत करेल.

 कर सवलत नियम व अटी :

1.  कर सवलत फक्त भाड्याच्या घरात किंवा फ्लॅट मध्ये राहत असलेल्या कर्मचार्यांना घरभाडे पावती सादर केल्यास लागू आहे.तथापि,आपण भाड्याने घेतलेल्या निवासस्थानात रहात नसल्यास एच.आर.ए. पूर्णपणे  करपात्र आहे.
2.  जे  कर्मचारी आपल्या पैतृक निवस्थानात राहून आपल्या आई-वडिलास त्यांच्या  नावावर असलेल्या घराचे  भाडे देत असतील  तर त्यांना सुद्धा आयकरात सवलत मिळू शकते.
3.  स्वतःच्या नावावर  घर असूनही परगावी नोकरी असल्यामुळे भाड्याच्या घरात राहणारे कर्मचारी.
4.  जर आपण घरमालक आहात व आपल्यावर गृहकर्ज असेल आणि आपण भाड्याच्या जागेत राहात असल्यास,आपण एच.आर.ए.सवलत व गृहकर्ज(व्याज व मुद्दल)सवलत या दोन्हींचा लाभ घेऊ शकता.
5.  एक लाखा पेक्षा अधिक भाडे दिले असल्यास घरमालकाचे पॅन क्रमांक देणे अनिवार्य आहे.

 एच.आर.ए.  सूटची  गणना :

1.  प्राप्त एच.आर.ए.  रक्कम.
2. (Basic + D.A.) ची  40% रक्कम.  (महानगरांकरीता 50%)
3. सूत्र = (दिलेला किराया) – (Basic + D.A. चा 10%) नुसार रक्कम. (महानगरांकरीता 20%)

  वरील तिन्ही रकमेतून जी रक्कम सर्वात कमी असेल ती रक्कम आयकरात सवलत किंवा सूट प्राप्त रक्कम म्हणून गणना केली जाईल.
टीप:  सदर एच.आर.ए. सूट कॅल्क्युलेटर हा नॉन-मेट्रो शहरामध्ये रहात असलेल्या कर्मचार्यांकरिता  आहे.
    मेट्रो शहरामध्ये ( दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई) राहणाऱ्या कर्मचार्यांनी गणना करण्याकरिता









HRA REBATE CALCULATOR


सदर एच.आर.ए. सूट कॅल्क्युलेटर हा नॉन-मेट्रो शहरामध्ये रहात असलेल्या कर्मचार्यांकरिता आहे.
येथे वार्षिक रक्कम भरावी 

  Enter BASIC :  

 Enter GP Rs. :  
  
Enter DA Rs. :  
        Enter HRA Rs. :           
 Enter RENT Paid Rs. :         

 
1• घेतलेला घरभाडे भत्ता

2• BASIC + GP + DA चा 40%

3• सूत्रानुसार प्राप्त सूट

वरील तिन्ही रक्कम मधून देण्यात येणारी
कमीत कमी सुटप्राप्त रक्कम


Created By : Yatin Pashine (BDHS KANHAN).