प्रस्तावना

   श्री बळीरामजी दखने व श्री जतीरामजी बर्वे यांच्या अथक परिश्रमाने शिक्षण विकास मंडळाची स्थापना करण्यात येवून ते पंजीकृत करण्यात आले. शिक्षण विकास मंडळाच्या कार्याकारीनीची स्थापना करून कन्हान येथे विकास हायस्कूल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
      या हायस्कूलचे प्रथम मुख्याध्यापक म्हणून श्री बलवंतकुमार थटेरे यांची  नियुक्तिी करण्यात आली. कन्हान येथे जिल्हा परिषद नागपूर द्वारे इंडिअन इंग्लीश मिडलस्कूल च्या नावाने पुर्व मायमिक शाळा वर्ग 5 ते 7 पर्यंत होती.  जिल्हा परिषदेचे वर्ग 5 ते 7 चे वर्ग बंद करण्यात येवून तेथील विद्यार्थी विकास हायस्कूल येथे समायोजित करण्यात आले.
     अशाप्रकारे विकास हायस्कूल कन्हान येथे 01/07/1963 पासून वर्ग 5 ते 7 व या परिसरात उत्तीर्ण झाालेले वर्ग 7 च्या विद्याथ्‍​र्यांना विकास हायस्कूल येथे वर्ग 8 मध्ये प्रवेश देण्यात आला व विकास हायस्कूल  येथे वर्ग 5 ते 8 पर्यंत अध्ययनाचे कार्य सुरू झाले. 


    पहिल्या वर्षी  वर्ग  5 ते 8 मध्ये एकूण 240 विद्याथ्‍​र्यांनी प्रवेश घेतला. श्री बलवंतकुमार थटेरे मुख्याध्यापक व 5 शिक्षकांची सहा. शिक्षक म्हणून नियुक्ती केली. तसेच एक पुरूष चपराशी व एक महिला चपराशी नियुक्त करण्यात आली. शाळेला लागणारे आवश्यक वस्तु जसे फर्निचर,शालेय साधन, स्टेशनरी, टिचर्स रेफरल बुक्स तथा बहुतेक  सर्व प्रकारचे शैक्षणिक साधन खरेदी करण्यात आले. शाळा सुचारूपणे व प्रसन्न वातावरणात सुरू झाली. हयात अनेक पालक व हितचिंतकांनी शाळेला अमोल सहकार्य केले.
 

                                                              शाळेचा विस्तार   

                                       वर्ष      1/7/63 ते 30/06/1964    वर्ग 5 ते 8 पर्यंत
                                       वर्ष      1/7/64 ते 30/06/1965    वर्ग 5 ते 9 पर्यंत
                                       वर्ष      1/7/65 ते 30/06/1966    वर्ग 5 ते 10 पर्यंत  
                                                   
                                                       शाळेचा विस्तार झाला.

     हायस्कूल विभागात 1 इंग्रजी शिक्षक, 1 विज्ञान व गणित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. वर्ग 10 ला माध्यमिक शिक्षण मंडळाची मान्यता मिळून प्रथम बॅच 1966 ला एस.एस.सी. बोर्डच्या परिक्षेला बसली. मार्च 1966 मध्ये एकूण 40 विद्यार्थी परिक्षेला बसले व 75टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हयातील ग्रामिण विभागातून  विकास हायस्कूल कन्हानच्या वर्ग 10 च्या निकालाची टक्केवारी पाहून शाळेला सम्मानित करण्यात आले व त्यानंतर दरवर्षी निकालात प्रगती होतच गेली.
   
     सन 1968 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक हयांनी शाळेच्या स्नेहसंमेलनांत उपस्थित राहून 45 मिनीट मार्गदर्शन करून शाळेचे गुणगौरव केले. दुसर्‍या वर्षी त्यांनी शाळेली दिड एकर जमीन उपलब्ध करून दिली व हया जागेवर शाळेची इमारत बांधण्यासाठी शिक्षण संस्था आपले प्रयत्न वेगाने करू लागली. 

    
     3 वर्षानंतर महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री श्री वसंतदादा पाटील  यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली व त्यांनी श्री बळीरामजी दखने व श्री जतीरामजी बर्वे यांच्या सोबत चर्चा करून महाराष्ट्र शासनाने शाळेकरीता दान केलेली दिड एकर जमीन जीजामाता हॉस्पीटलला देण्यात यावी व त्याबदल्यात दुसर्‍या प्रशस्त ठिकाणी शाळेकरीता जमीन उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. शासनाच्या संमानार्थ ही शाळेची जमीन जिजामाता हॉस्पीटलला देण्यात आली. त्यानंतर संथेचे अध्यक्ष श्री बळीरामजी दखने व मुख्याध्यापक श्री थटेरे यांच्या प्रयत्ननाने दोन एकर जमीन खरेदी करून शाळेची प्रशस्थ इमारत 1980 मध्ये बांधण्यात आली.  या इमारतीत 20 वर्गखोल्या, एक हॉल, हॅंडपंप,विघृत कनेक्शन, दोन ग्रामपंचायतचे दोन नळ कनेक्शन, मेन रोड अॅप्रोच रोड,कंपाउंड, मुलामुलींचे स्वतंत्र प्रसाधन गृह, वृक्षारोपण, पाणी ची टाकी, कुंडीमध्ये फुलझाडे लागवड व स्वच्छ परिसराची निर्मिती केली. शिक्षकांनी यासाठी विशेष सहकार्य केले.
     इ.स. 1966 मध्ये विकास प्राथमिक शाळा वर्ग 1 ते 4 पर्यंत सुरू करण्यात आली. 
     शाळेचे मुख्याध्यापक श्री बलवंतकुमार थटेरे यांना शासनातर्फे आदर्श शिक्षकाचे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. ते 1963 ते 1996 पर्यंत 33 वर्ष मुख्याध्यापक राहून 1996 ला सेवानिवृत्त झाले.
    1997 मध्ये शाळेचे नांव विकास हायस्कूल ला बदलवून बळीरामजी दखने हायस्कूल कन्हान असे नामांतरण करण्यात आले.   सन 2001 पासून शाळेत वर्ग 5 पासून सेमिइंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुरूवात करण्यात आली. परिसरातील अनेक विद्याथ्‍​र्या कडून कोणत्याही प्रकारचा  अतिरिक्त शुल्क  न घेता सेमि इंग्रजी माध्यमातून या शाळेत शिक्षण देण्यात येते. शाळेत संगणक कक्ष व प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.  विद्याथ्‍​र्यांना खेळण्याकरीता विविध खेळ साहित्य व मोठे क्रीडांगण शाळेच्या आवारात उपलब्ध आहे. दरवर्षी विविध  प्रकारच्या क्रीडा स्पर्धा या क्रीडांगणात आयोजित करण्यात येतात. ज्यात विविध शाळांचे खेळाडू  भाग घेतात.

    
    संस्थेमधील उत्कृष्ट शिक्षणामूळे आज शाळेतील विद्यार्थी समाजात चांगल्या जागेवर काम करीत आहेत. शाळेने अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर,शिक्षक,अॅडव्होकेट्स, उपजिल्हाधिकारी,तहसिलदार घडविले आहे. 
    राजकारणात खासदार, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष,  सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, समाजसुधारक व अनेक अधिकारी या शाळेने  घडविले आहे.