बळीरामजी दखने हायस्कूल कन्हान
बळीरामजी दखने हायस्कूल ही शाळा कन्हान येथे स्व. बळीरामजी दखने यांनी सन १९६३ मध्ये प्रारंभ केलेली होती. त्यावेळी कन्हान परिसरात एकही माध्यमिक शाळा नव्हती. मा. बळीरामजी दखने यांच्या अथक प्रयत्नामुळे कन्हान परिसरात माध्यमिक शाळा प्रारंभ करण्यात आली. आज या शाळेचे रुपांतर एका वट वृक्षात झालेले आहे. शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्री बलीरामजी दखने , अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी दखने व संस्थापक मुख्याध्यापक श्री बळवंत थटेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेऊन उंच शिखर गाठले आहे.
70 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम
आज 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स. 8:00 वा. संस्थेचे संस्थापक मुख्याध्यापक श्री बी.के. थटेरे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडावंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.डी.नारनवरे यांनी प्रास्ताविक भाषण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व देशभक्तीपर गीते प्रस्तुत केले.