बळीरामजी दखने हायस्कूल कन्हान

     

        बळीरामजी दखने हायस्कूल ही शाळा  कन्हान येथे स्व. बळीरामजी  दखने यांनी सन १९६३ मध्ये प्रारंभ केलेली होती. त्यावेळी कन्हान परिसरात एकही   माध्यमिक शाळा  नव्हती.  मा. बळीरामजी  दखने यांच्या अथक प्रयत्नामुळे कन्हान परिसरात माध्यमिक शाळा प्रारंभ करण्यात आली. आज या शाळेचे रुपांतर एका वट वृक्षात झालेले आहे.   शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री बलीरामजी दखने , संस्थापक मुख्याध्यापक श्री बळवंत थटेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेऊन उंच शिखर गाठले आहे.