आज 26 जानेवारी ला गणराज्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स. 8:00 वा. संस्थेचे संस्थापक मुख्याध्यापक श्री बी.के. थटेरे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडावंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. डी. नारनवरे यांनी प्रास्ताविक भाषण केले. या
प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे
प्रात्यक्षिक सादर केले.
. विकास प्राथमिक विद्यालय आणि बळीरामजी दखने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते,नृत्य व नाटके सादर केले. तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले शाळेचे माजी
मुख्याध्यापक श्री सी. पी. चौकसे सरांचे संस्थेद्वारे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
चालू शैक्षणिक सत्रात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थांना अध्यक्ष
महोदयांच्या हस्ते पारितोषिके देऊन पुरस्कृत करण्यात आले.
मा. अध्यक्ष महोदयांनी आपल्या भाषणेतून विद्यार्थ्यांना विस्तृत असे
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री सचिन अल्लडवार सरांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका
सौ. ठमके मैडम यांनी केले. याप्रसंगी विध्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी शिक्षक, पालकवर्ग व गणमान्य व्यक्ति उपस्थित होते.