नवर्षाचे कार्यक्रम



बळीरामजी दखने हायस्कूल येथे नववर्ष निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

    बळीरामजी दखने हायस्कूल कन्हान येथे आज नववर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नववर्षानिमित्त शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले होते.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.डी. नारनवरे हे होते, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी चे स्थान श्री राजेश यादव (सदस्य, न.प.कन्हान) व सौ. व्ही.जे. ठमके(पर्यवेक्षिका) यांनी भूषविले. मा. अध्यक्ष व अतिथींनी मा शारदेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली.



 सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी गीत,नृत्य व नाटके सादर केली.





    सांस्कृतिक कार्यक्रमानंतर लगेच विद्यार्थी/शिक्षकांचे सह्भोजानाचे आयोजन करण्यात आले त्यात उपस्थित सर्व विद्यार्थी  व शिक्षकांनी सहभोजनाचे आनंद घेतले. 


    
   वरील कार्यक्रम  यशस्वी करण्या  करिता सर्व उपस्थित शिक्षकांनी प्रयत्न केले.